भारतात जन्माला आलेला टॅटल हा एक नागरी-तांत्रिक प्रकल्प आहे ज्याचा प्रमुख उद्देश हा पडताळणी करून सत्य सिद्ध झालेली माहिती अधिक सहज पणे समजू शकेल अशा स्थानिक भाषांमध्ये प्रथमच मोबाईल वापरणाऱ्या लोकांपर्यंत पोचवणे हा आहे. व्हाट्सअँप चा वापर करून पसरणाऱ्या खोट्या माहिती आणि अफवांना तोंड देता यावे या उद्देशाने या प्रकल्पाची सुरुवात झाली असली तरीही आता ह्या प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात इतर चॅट ऍप आणि encrypted network चा समावेश झाला आहे.
आमची अशी आकांक्षा आहे कि येणाऱ्या काळात आम्ही : व्हाट्सअप आणि इतर चॅट आप द्वारे पसरविल्या जाणाऱ्या खोट्या माहिती आणि अफवांचे आयुर्मान कमी करण्यास मदत करणे
आमच्या तत्तवांबद्द्ल चा दृष्टिकोन जाणून घेण्यासाठी हि माहिती वाचा
टॅटल हि भारतात खासगी कंपनी म्हणून नोंदणीकृत केलेली आहे. आम्ही खासगी कंपनी म्हणून नोंदणीकृत होण्या मागे कायदेशीर बाबींचे पालन करताना होणाऱ्या खर्चाची बचत व्हावी हा प्रमुख उद्देश आहे. Al Ethics Initiate कडून आम्हाला आर्थिक साहाय्य मिळाले आहे. Denny आणि Tarunima हे दोघे या प्रकल्पाचे खूप कालावधी पासून काम पाहतात. आत्तापर्यंत या प्रकल्पाला अनेक स्वयंसेवक, मुक्त माहिती चे योगदान करणारे लोक आणि हंगामी काळासाठी कामावर घेतलेले लोक यांचे सहकार्य लाभले आहे. आम्ही कायमच नवीन लोकांच्या शोधात असतो.
अनेक प्रकारे! जर तुम्ही एक सुजाण नागरिक , माहिती ची पडताळणी करणारे स्थानिक, कलाकार, लेखक, ग्राफिक डिझायनर , इंजिनिअर शिक्षक किंवा ऑनलाईन संवादा ला अधिक सुदृढ बनवण्या साठी उत्सुक असलेली व्यक्ती असाल तर आम्हाला तुमच्या सोबत एकत्र येऊन काम करायला नक्की आवडेल. आमच्या Contact Us पेज वर जाऊन आम्हाला संपर्क करा.